Ekach Ya Janmi Janu 2.0 // एकाच या जान्मी जणू 2.0
Last summer, I had the crazy idea to readapt one of my favorite Marathi songs of all time, “Ekach Ya Janmi Janu,” composed by Sudhir Phadke and sung by Asha Bhosle for the movie “Pudhcha Paool.”
Released in the 1980s, the song was ahead of its time in many ways I feel. A very modern arrangement—for its time— featuring a beautiful string section that is just barely audible in the original recording. “What if it was recorded using today’s latest recording technology?” I asked myself. Soon that was followed by the thought: “…what if I just recorded it myself?”
I had wanted to do an international collaboration project bringing together artists from India, Europe, and North America. “Ekach Ya Janmi Janu 2.0” is that dream project. It is a readapted version of the Marathi classic, transformed into a duet with a brand-new stanza written in the style of Sudhir Moghe by the super talented Sameer Jirankalgikar. Sharayu Date and Shreyas Bedekar have both given stellar vocal performances, and I was lucky to record Shruti Bhave on violin and Manish Kulkarni on bass, mandolin, and acoustic guitar as well. The song also features the majestic Budapest Art Orchestra playing several passages from the original song as well as a brand-new string feature and second verse, composed by yours truly and brilliantly orchestrated by my dear friend Enrique Ponce. Recorded in Fort Wayne, Budapest, Mumbai, and Pune, the project is a celebration of the beauty of Marathi music in a globalized world.
Coming later this month… I can’t wait to share “Ekach Ya Janmi Janu 2.0” with you all!
मागच्या वर्षी माझं अतिशय आवडीचं गाणं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं, "पुढचं पाऊल" या चित्रपटातलं "एकाच या जन्मी जणू," मला एका नवीन स्वरूपात ध्वनिमुद्रित करायची कल्पना सुचली.
८० च्या दशकात रिलीज झालेलं हे गाणं काळाच्या खूप पुढे होतं असं मला नेहमी वाटलेलं आहे... अतिशय मॉडर्न असं संगीत संयोजन, सुंदर स्ट्रिंग्स, जे मूळ ध्वनिमुद्रणात नीट ऐकायलाही येत नाहीत. "आज उपलब्ध असलेल्या रेकॉर्डिंग टेक्नोलॉजी मध्ये हे कसं ऐकू आलं असतं?" असा प्रश्न मला पडला. त्यानंतर लगेच हा विचार आला: "…अरे, हे तर मीच स्वतः करू शकतो!" बरेच दिवस मला भारतातले, युरोप मधले, आणि नॉर्थ अमेरिकेतले कलाकार एकत्र घेऊन एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट करायचाच होता. "एकाच या जान्मी जणू 2.0" असा हा अविष्कार लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी येत आहे!
मूळ गाण्याचं एक युगुलगीत बनवण्यात समीर जिरांकलगीकर दादाचा खूप मोठा हात होता. त्याने सुधीर मोघ्यांच्या मूळ गीतात अगदी चोख बसेल असा एक पुरुषाच्या दृष्टिकोनातला नवीन अंतरा लिहिला आहे. शरयू दाते आणि श्रेयस बेडेकर यांचे सुंदर आवाज या गाण्याला लाभले आहेत. व्हायोलिन वरती श्रुती भावे आणि बेस गिटार, अकोस्टिक गिटार, आणि मॅनडोलिन वरती मनीष कुलकर्णी दादाला सुद्धा ध्वनिमुद्रित करायची संधी मिळाली. त्याचप्रमाणे, बुडापेस्ट आर्ट ऑर्केस्ट्राचे अतिशय कमालीचे व्हायोलिन, व्हीओला, आणि चेलो वादकही या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्यांनी वाजवलेले भाग काही मूळ गाण्यातले आहेत आणि काही मी नव्याने संगीतबद्ध केलेले आहेत. माझ्या मदती साठी एन्रिके पॉन्से या माझ्या मित्राने स्कोर तयार केला. असं हे गाणं फोर्ट वेन, बुडापेस्ट, मुंबई, आणि पुणे अश्या शहरांमध्ये ध्वनिमुद्रित झालं. मराठी संगीताचं सौंदर्य जगात सगळीकडे पसरेल अशी माझी आशा आहे!
लवकरच…!